पंढरपूर / वार्ताहर
उत्तरप्रदेशमधील हाथरस व बलरामपूर येथील गावांमध्ये बलात्कार करुन दोन मुलींची हत्या करण्यात आली आहे. गाव पूर्णपणे दहशतीमध्ये असून, पीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी माध्यमांचे प्रितनिधी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतू त्यांच्यावरती सरकार व पोलिस प्रशासन दडपण व दमदाटी करीत असल्याच्या निषेधार्त पंढरपुरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी पत्रकारांनी एक तास आत्मक्लेश आंदोलन केले.
शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकस्थळी शहर व तालुक्यातील पञकार बांधवांनी सकाळी दहा वाजता आत्मक्लेश आंदोलनास सुरुवात केली. तासभर मौन पाळुन उत्तरप्रदेश येथील घटनेत माध्यमांच्या प्रतिनिधीवरील दबावाचा व दडपशाहीचा यावेळी निषेध
केला. लोकशाहीमध्ये लोकांच्या समस्या, अन्याय व अत्याचाराच्या घटना सोडविण्यासाठी माध्यमे प्रयत्न करीत असतात. परंतू उत्तरप्रदेशमध्ये सरकार व पोलीस प्रशासनाकडून माध्यमांची होत असलेली मुस्कटदाबी गंभीर बाब आहे. उत्तरप्रदेशच्या सरकारकडून पत्रकारांची अशा प्रकारची मुस्कटदाबी ही निषेधार्ह आहे.
भारतामध्ये माध्यमांवरती बंधने घातली जात आहे. उत्तरप्रदेश मधील हाथरस व बलरामपूर येथील घटनेत माध्यम प्रतनिंधींना वार्तांकन करण्यासाठी अटकाव करण्यात येत आहे. गावाच्या आसपासच्या परिसरात पोलिसांचा कडा पहारा देण्यात आला आहे. बळजबरीने पञकारांना तेथून गाडीत बसवून तेथून बाहेर पाठविले जात आहे.
यावेळी मंदार लोहोकरे, शिवाजी शिंदे, ज्येष्ठ पत्रकार सिध्दार्त ढवळे, विकास पवार, सूर्यकांत बनकर, हरिभाऊ प्रक्षाळे, अभय जोशी, सुनिल दिवाण, सुनिल उंबरे, नवनाथ पोरे, अभिराज उबाळे, संकेत कुलकर्णी, सचिन कसबे, विरेंद्र उत्पात, नागनाथ सुतार, माऊली डांगे, नितीन शिंदे, सुरज सरवदे, बजरंग नागणे, संतोष रणदिवे, दिनेश खंडेलवाल, समाधान भोई, मोहन डावरे, अतुल बडवे, संजय कोकरे, नवनाथ खिलारे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









