तरूण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्री गेल्या महिन्यापासून नियंत्रणात आलेला कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. मंगळवारी पंढरपूर शहर आणि तालुक्यात तब्बल 60 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
गेल्या महिनाभरात प्रतिदिनी अगदी मोजकेच कोरोनाबाधित रूग्ण हे पंढरपूरात आढळल्यांचे चित्र होते. यामध्ये एकही दिवशी कोरोनाबाधिताचा आकडा हा 30च्यावर गेला नव्हता. मात्र मंगळवारी उच्चांकी 60 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. यामध्ये ग्रामीणमध्ये 41 तर शहरी भागात 19 रूग्ण आढळले आहेत.
कोरोनाची पंढरपूरातील स्थिती
आजपर्यतचे एकूण कोरोनाबाधित रूग्ण – 5944
कोरोनामुळे झालेले मृत्यू – 171
कोरोनामुक्त झालेले रूग्ण – 5365
कोरोनाचे उपचार सुरू असणारे रूग्ण – 408