मृतदेह शोधण्यासाठी लागले दोन तास
प्रतिनिधी / निलंगा
मुसळधार पावसात ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जुबेर हन्ना शेख (वय-३४) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जाऊ येथील शेतकरी जुबेर शेख हे सकाळी आपल्या शेताकडे गेले होते. शेतीकाम करून सकाळी वाटेतील ओढा ओलांडून घरी येत असताना अचानक चिखलात पाय घसरून वाहत्या पाण्याच्या लाटेत वाहून गेले. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचा शोध घेण्यासाठी तब्बल दोन तास लागले. मात्र अखेर जुबेर मृतावस्थेत गावक-यांना आढळून आले.
मध्यरात्रीपासून पावसाने रोद्ररूप धारण केले असून निलंगा तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. ओढे नाले नद्या पूर्णपणे भरून वाहत आहेत. ओढ्याच्या पाण्यात शेतकरी वाहून गेल्याने व त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









