प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने नियम आखून दिले आहेत. परंतू नियम मोडणाऱ्या ३ हजार नागरिक, व्यापारी यांच्याकडून १ ते १५ जुलै दरम्यान सोलापूर महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई करून साडेचार लाख रुपये दंड वसुल केला आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर व उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांचे आदेशानुसार मुख्य सफाई अधीक्षक संजय जोगदनकर व सफाई अधीक्षक विजयकुमार कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांनी सदरची कारवाई केली. यामध्ये नागरिक, व्यापारी यांनी मास्क न घालणे, हँडगलोज न वापरणे, रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे आदी बाबींचा समावेश आहे.
गुरुवारी ६३ हजार रु. दंड वसुल
शहरातील किराणा दुकानदार, चार चाकी गाडीवरील भाजी विक्रेते, व्यापारी व नागरिक यांनी मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे आदी बाबत ६३ हजार ४५० रुपये दंड वसुल केला.
Previous Articleबेळगाव जिह्यात आणखी 120 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह
Next Article दुचाकी चोरणाऱया त्रिकुटाला अटक









