प्रतिनिधी / सोलापूर
अतिरिक्त कर आकारणी व कर संकलन प्रमुख प्रविण दंतकाळे यांची नियुक्ती वर्षभरानंतर पुन्हा नगरसचिव पदी केली आहे. याबाबतचे आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी दिले.
वर्षभरापूर्वी प्रविण दंतकाळे हे नगरसचिव पदी कार्यरत होते. मात्र अनेक नगरसेवकांच्या त्यांच्याबद्दल तक्रारी आल्याने त्यांची नियुक्ती अतिरिक्त कर आकारणी व कर संकलन प्रमुख पदी करण्यात आली होती. तर त्यांच्या ठिकाणी नगरसचिव म्हणून रऊफ बागवान यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सध्या नगरसचिव रऊफ बागवान यांची तक्रार खुद्द महापौर श्रीकांचन्ना यन्नम यांनी करत त्यांच्या ठिकाणी दुसरा अधिकारी नेमण्याचे पत्र आयुक्तांकडे दिले होते. परिणामी नगरसचिव रऊफ बागवान यांची या पदावरुन हकालपट्टी झाली असुन त्यांच्या ठिकाणी पुन्हा नगरसचिव म्हणून प्रविण दंतकाळे यांची नियुक्ती केली आहे. तर नगरसचिव रऊफ बागवान यांची नियुक्ती कर आकारणी कार्यलयात कार्यालय अधिक्षक पदी करण्यात आली आहे.
Previous Articleसातारा जिल्ह्यात 893 नागरिकांना दिला डिस्चार्ज
Next Article अन्नभाग्य योजनेचा 12 लाखाचा तांदूळ जप्त









