तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर- दौंड रेल्वे दुहेरीकणाचे काम वर्षभरात पूर्ण होईल. भिगवण ते भाळवणी हे 55 किलोमीटरचे अंतर असून यातील 22 किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दौंड ते सोलापूर सेक्शनमध्ये येणाऱया दौंड, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ आणि सोलापूर स्थानकाची पाहणी करण्यात आली आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पत्रकार पत्रकारांशी बोलताना दिली. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये वार्षीक निरीक्षण निमित्ताने दौंड-सोलापूर सेक्शनमध्ये सरव्यवस्थापक संजीव मित्तल आले शुक्रवारी आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मित्तल म्हणाले, शुक्रवारी 10 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता दौंड स्थानकापासून निरीक्षण करण्यास सुरुवात झाली. यानंतर दौंड ते सोलापूर दरम्यान झालेल्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी केली. दौंड स्थानकावरील वेंटिग हॉल, व्हीआयपी लाउंज, पू लॉबी आणि स्टेशन परिसरमधील गॅंग हट, रेल्वे कॉलनी, रनिंग रुम, टॉवर वॅगन शेड इत्यादींची तपासणी करण्यात आली. वाशिंबे-फोफलज स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे पुलाची पाहणी केली. गॅंग आणि सर्व वळणांची पाहणी करण्यात आली. कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर पाण्याचा होणारा तुडवडा यासाठी रिसायलिंग प्लॉटची उभारण्यात आला आहे.
यामुळे कुर्डूवाडी स्थानकावर अनेकदा पाणी कमी येत असल्याने रिसायलिंग प्लॉट केला आहे याची देखील मित्तल यांनी पाहणी केली. त्याचबरोबर स्थानकावर नुक्कड नाटकाच हे स्थानकावर सादरीकरण करण्यात आले. माढा, मोहोळ स्थानकावर देखील विविध कांमाची पाहणी केली. सरव्यवस्थापक मित्तल म्हणाले, दौंड ते सोलापूर सेक्शनमधील सर्वच कामे सुरु आहेत. येत्या डिसेंबर अखेर दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर सोलापूर ते वाडी दरम्यान देखील दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. येत्या 20 मार्च अखेर दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल. लातूर येथे कोच पॅक्टरी सुरु करण्यात आली आहे. कोच पॅक्टरीचे काम अद्याप 40 टक्के झाले आहे. येत्या डिसेंबर ते जानेवारी पर्यत कोच पॅक्टरीचे काम पूर्ण होईल आणि येथे कोच तयार होतील. सोलापूर स्थानकावरुन अनेक गाडय़ा सुरु कराव्यात असे अनेक रेल्वे कर्मचारी, संघटनांनी निवेदन दिले आहे. पण अद्याप नवीन गाडय़ा सुरु करण्यात येणार नाही. कारण सोलापूर ते पुणे आणि सोलापूर ते वाडी दरम्यान दुहेरीकणाचे काम सुरु असल्याने काम पूर्ण झाल्यानंतर नवीन गाडय़ा सुरु करण्यात येतील असे देखील ते यावेळी म्हणाले.
मागील चार ते पाच वर्षापासून सर्व सेक्शनमध्ये कामे सुरु आहेत. लूज मार्जीनमुळे अनेक गाडय़ांना सध्या उशीर होत आहे. मात्र सर्व स्थानकावरील गाडय़ांचे वेळापत्रक पाहून त्याचे निरीक्षण केले जाते. सध्या सर्वत्र 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. सोलापूर ते उस्मानाबाद रेल्वे सुरु केली जाणार आहे. मात्र सध्या भूसंपादनाचे काम सुरु असल्याने येत्या काही महिन्यांमध्ये याचे देखील काम सुरु होईल.
या पत्रकार परिषदेस प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक डी.के.सिंग, प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक बी.के. दादाभोय, मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, प्रधान मुख्य अभियंता ए.के. अग्रवाल, मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता मनोज जोशी, मंडल रेल प्रबंधक शैलेश गुप्ता, अपर मंडल रेल प्रबंधक व्ही. के. नागर, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदिप हिरडे, वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक प्रविंद्र वंजारी रेल्वे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
हेल्थ एटीएम सेंटरचे उद्घाटन
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर हेल्थ एटीएमचे उद्घाटन केले. मित्तल यांनी सोलापूर स्थानकावर उभारण्यात आलेल्या हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सीजन पल्सची तपासणी केली. यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना आणि कर्मचाऱयांना माफक दरात तपासण्या करण्यात येणार आहेत.
रेल्वे मैदानावर टेनिस कोर्टचे उद्घाटन
सोलापूर स्थानकावर मित्तल यांनी हेल्थ एटीएम सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. मध्य रेल्वेतील पहिला टॅक मशिन डेपो सोलापूरात उभारण्यात आला आहे. या डेपोचे सरव्यवस्थापक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रेल्वे मैदान येथील टेनीस कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. सोलापूर रेल्वे स्थानकावर कर्मचारी आणि प्रवाशांना विविध तपासण्या हेल्थ एटीएम सेंटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.









