वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिला हिरवा कंदील
कुर्डुवाडी / प्रतिनिधी
कुर्डुवाडी ते लातूर या एकूण १८० किलोमीटर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. यातील कुर्डुवाडी ते पांगरी या ५७ किमीच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. बुधवार दि. ८ डिसेंबर रोजी चेअरमन रेल्वे सुरक्षा अधिकारी मनोज अरोरा यांनी या मार्गाची पाहणी करुन याला हिरवा कंदील दिला.
प्रारंभी पांगरी ते बार्शी दरम्यान विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी टॉवर वॅगनने चेअरमन रेल्वे सुरक्षा अधिकारी मनोज अरोरा, सहा चेअरमन सी. आर. एस. कटारीया, डि. आर. एम. शैलेश गुप्ता यांनी पाहणी केली. यावेळी डिव्हिजनल इलेक्ट्रीक इंजिनिअर पराग, आर. ई. सेक्शन इंजिनिअर शिवशंकर, टॉवर वॅगन सेक्शन इंजिनिअर बलराम, ट्रॅफिक इन्सपेक्टर गायकवाड उपस्थित होते. या टॉवर वॅगनचे चालक म्हणून लोकोपायलट आनंद महामुनी, लोकोपायलट रियाज शेख हे होते.
सदर काम यशस्वी झाले असल्याची खात्री झाल्यानंतर दुपारी ३.३० वा कुर्डुवाडी-पांगरी अशी ताशी १२० किमी वेगाने दहा डब्यांसह विद्युत रेल्वेची चाचणी घेण्यात आली. यावेळी सी. आर. एस. पथकासोबत लोको इन्सपेक्टर व्ही. एच. कुलकर्णी, एस एस राव,ट्रॅफिक इन्स्पेक्टर सुभाष पाडुळे हे उपस्थित होते.या विद्युतरेल्वेचे लोकोपायलट रवींद्र भंडारे, सहा लोकोपायलट एस. के. पाल व गार्ड म्हणून प्रभाकर अस्वरे यांनी काम पाहिले. या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम रेल्वे इलेक्ट्रिकल सिकंदराबाद येथील कंपनीकडून करण्यात येत आहे.