प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील तलावाच्या पाणी पुजनाच्या कारणावरून दोन गटात मारामारी झाली. यात पाच जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांच्यासह पाच जणांवर काल, शुक्रवारी (दि.8) गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोंढेज येथील येथील पांडुरंग विष्णू फाटके यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
कोंढेज येथील तलावात दहिगाव उपसासिंचन योजनेतून पाणी आले आहे. हा तलाव अजून पूर्ण भरलेला नाही. या तलावाच्या पाणी पूजनावरुन दोन गटात हा वाद झाला. तलाव अजून भरलेला नाही. पूर्ण तलाव भरल्यानंतर पाण्याचे पूजन करावे, अशी एका गटाचे म्हणणे होते. तर दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते पाणी पूजन करण्यासाठी गेले होते. पाणी पूजन करायला गेलेल्या गटाला अडवल्याने हा वाद झाला व यांच्यात तुफान हाणामारी झाली. माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सध्या करमाळा तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
Previous Articleसांगली : पूर्ववैमनस्यातून हरिपूर येथे युवकाचा खून
Next Article रूईच्या सरपंचांचा जातीचा दाखला अवैध









