तरुण भारत संवाद प्रतिनिधी/तुळजापूर
मंदीरे खुले करण्यासाठी शांततेने सुरु असलेले आंदोलन दडपशाहीचा वापर करुन चिरडुन टाकण्याचा प्रयत्न राज्यसरकार करीत आहे. १४४ कलमामुळे भाविकांना बाहेरुन का दर्शन मिळेना त्यात अडथळा येवु नये व व्यापारी वर्गाचे नुकसान होवु नये म्हणून हे आंदोलन मागे घेतले नसुन स्थगित केल्याचे सांगुन ठाकरेनी पाच वर्ष सरकार चालवुन दाखवावे असे आव्हान देत साधुसंत ठाकरे सरकार पाडतील असा इशारा भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी पञकार परिषदेत दिला.
भाजपा आधात्मिक आघाडी सरकारचा वतीने राज्यातील मंदीरे उघडण्यासाठी गुरुवार दि ५ पासुन श्रीतुळजाभवानी मंदीरा समोर साधुसंतांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. मात्र प्रशासनाने काल, गुरुवार रात्री श्री.तुळजाभवानी मंदीर परिसरातील तीनशे मिटर परिसरात १४४ कलम लागु करुन सहभागी साधुसंताना नोटीस बजावून आंदोलन होवू नये यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला. या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवार सकाळी अकरा वाजता आचार्य तुषार भोसले यांनी पञकार परिषद घेवुन आंदोलन मागे नाही तर स्थगित करीत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, मंदीर कधी उघडणार या बाबतीत मुख्यमंत्रीना दोन निवेदन दिले पण त्यांनी आमची दखल न घेतल्याने हे आंदोलन सुरु केले. हे आंदोलन दडपशाहीचा मार्गाने चिरडण्याचा प्रयत्न केला. या कामी साधुसंतांना यात सहभागी होवु नये म्हणून नोटीसा बजावला. त्यामुळे संत कधीही काळ्या फित लावुन निषेध करीत नाही पण करण्याची वेळ आणली. रातोरात प्रशासनाने तंबु उखडुन लोकशाहीचा साधुसंत भक्ताचा अधिकार हिसकावून घेतला. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे शुक्रवार नवचंडी यज्ञ आयोजन होते. ते होवु दिला नाही. याची फळे यांना भोगावे लागतील असेही ते म्हणाले. यामुळे ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघडा पडला मुह मे राम बगल मे छुरी हे ठाकरेचे वर्तन यावरुन दिसुन आले. राज्यातील ठाकरे सरकार हे मोगलांपेक्षा वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळ सरकार असल्याची टीकाही केली. तर, हिंमत असेल तर निवडणूक लावून दाखवा, तुमचं सरकार पाडू, असं थेट आव्हानही त्यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. महाराष्ट्रात आपतकाल स्थिती सुरु झाल्याचे यावेळी म्हणाले.
आंदोलन स्थगित केलं नाही तर पुढील १५ दिवस तुळजापूरमध्ये कलम १४४ लागू करु, अशा इशारा प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती तुषार भोसले यांनी दिली. त्यामुळे परिसरातील व्यापारी आणि तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
भक्ताचा भावनेसाठी आंदोलन : मंहत मावजीनाथ
हे आंदोलन भक्ताचा भावनेसाठी सुरु होते. कुलचार कुलधर्म बंद असल्याने भक्त नैराश्यात चालले असल्याचे सांगुन हे आंदोलन पक्षाचे नाही तर साधुसंत भक्तांचे असुन आमचा ऐका हातात माळा राहु द्या दुसऱ्या हात उचलायला भाग पडू नका असा इशारा येथील दशावतार मठाचे मंहत मावजीनाथ बाबांनी यावेळी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









