– टेंभूर्णी, होटगीरोड येथील प्लँटमधून हवेतून ऑक्सिजन निर्मिती
प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांसाठी ऑक्सजिनचा तुटवडा भासू देणार नाही. जिह्यात 20 मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल झाले असून बारा मेट्रिक टन शहरातील होटगीरोड आणि टेंभूर्णी येथील प्लँटमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करीत आहोत. जिह्यातील रुग्णालय यांना समसमान ऑक्सजिन वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी `तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.
सोलापूर शहर जिह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला. दुसरीकडे जिह्यात ऑक्सिजन, बेडचा तुटवडा निर्माण होत असल्याचे तक्रारी वाढत चालले आहे. ऑक्सिजन अभावी नागरिकांचे मृत्यू होत आहेत.
दरम्यान, जिह्यातील ऑक्सजिनच्या उपाययोजना विषयी जिल्हाधिकारी शंभरकर यांना विचारल्यास ते म्हणाले, जिह्यात कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. जिह्याला दररोज 31 मेट्रिक टन ऑक्सीजन लागते. त्यापैकी 20 मेट्रिक टन सोलापुरात दाखल झाले आहे. उर्वरित बारा मेट्रिक टन जिह्यातील दोन प्लँटमधून हवेतून निर्मिती करीत आहोत. त्यामुळे आता रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. कमी पडू ही देणार नाही, असेही शंभरकर यांनी सांगितले.
शहर, जिह्यासाठी 900 रेमडीसिव्हिर इंजेक्शन
सोलापूर शहर व जिह्यासाठी 900 रेमडीसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. शहरात 405, बार्शी तालुकासाठी 100 दक्षिण सोलापूरसाठी 17, पंढरपुरसाठी 141, सांगोला 45, मंगळवेढा 20, माळशिरस 114, करमाळा 18, माढा 40 अशा एकूण 900 रेमडीसाव्हिर इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. या इंजेक्शन चा उपयोग कोव्हिड रुग्णालय व कोव्हीड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी करायचा आहे. या इंजेक्शनचे वितरण ठरल्याप्रमाणे करायचे आहे, यात कसली गडबड खपवून घेतली जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.









