जिल्ह्यात 46 जणांचा मृत्यू : 175 रुग्णांवर उपचार सुरु
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरसह जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा विळखा कमी होत चाललेला आहे. दुसरीकडे म्युकरमायकोसिसने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जिह्यात आतापर्यंत 46 रुग्णांचा मृत्यू झाला तर 175 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
काही महिन्यापूर्वी शहर जिल्ह्यात कोरोनाचा उदेक झाला होता. मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. दरम्यान जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना आटोक्मयात आला आहे. आता म्युकरमायकोसिसने डोके वर काढले आहे. याने आतापर्यंत 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 462 म्युकरमायकोसिस बाधित रुग्ण आढळले असून 175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर बुधवारी 4 जण आढळले असून आतापर्यंत एकूण 46 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यत 242 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान 10 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वेळेवर औषध उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जिह्यात सध्या 175 म्युकरमायकोसिस रुग्ण ऍक्टिव्ह असल्याचे सांगितले. जिह्यातील 32 रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोनामुक्त झाल्यानंतर हा आजार
कोरोनातून बरे झाल्यानंतर काही दिवसातच अनेक जणांना म्युकरमायकोसिसचा आजार होत आहे. डोळे, नाकामध्ये होणाऱया संसर्गाच्या तक्रारी वाढत आहे. डोळÎांना सूज, नाकाला सूज, डोळे लाल होणे अशी सुरुवातीला लक्षणे आढळतात. मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार अधिक संभवतो. कोरोनावर उपचार करताना झालेल्या औषधांचा वापर आणि रुग्णांची कमी प्रतिकारशक्ती त्यात मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार होत आहे.
लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत
म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. रोज बरे होऊन रुग्ण घरी परतत आहेत ही चांगली बाब आहे. इंजेक्शन महाग असले तरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत मिळत आहे. लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित उपचार घ्यावे.
डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्य चिकित्सक
आकडे बोलतात
– एकूण रुग्ण – 462
– उपचार घेणारे रुग्ण – 175
– बरे झालेले रुग्ण – 242
– मृत्यू- 46
– रुग्णालय उपचार- 32 रुग्णालयात









