शहर जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर चुरशीने मतदान
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे. सकाळी आठ ते 12 या कालावधीत पदवीधरांसाठी 20.72 टक्के तर शिक्षकांसाठी 35.36 टक्के मतदान झाले आहे. मतदारांनी जास्त मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे. दुपारच्या सत्रात शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली.
पदवीधर मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्र 123 आहेत. या निवडणुकीत पुरुष पदवीधर मतदार 42 हजार 70 तर स्त्री पदवीधर मतदार संख्या 11 हजार 742 एवढी आहे. सकाळी आठ ते दहा या कालावधीत 9 हजार 473 पदवीधर पुरुषांनी तर 1679 एवढ्या महिला पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावला असून 20.72 टक्के मतदान झाले. तर, शिक्षक मतदार संख्या 13 हजार एवढी असून दुपारी 4066 पुरुष शिक्षकांनी मतदारांनी तर 737 महिला शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 4803 एवढ्या शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाची टक्केवारी 35.36 एवढी आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









