सोलापूर/ प्रतिनिधी
सोलापूर शहरात 371 तर ग्रामीणमध्ये 1129 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासात शहर आणि जिह्यात 1500 रुग्णांची भर पडली असून कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर शहरातील 3 हजार 396 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 371 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 3 हजार 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 224 पुरुष तर 147 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21 हजार 37 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये 8 हजार 993 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1129 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 7 हजार 864 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 1129 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 672 पुरुष तर 457 स्त्रियांचा समावेश आहे. जिह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 हजार 951 इतकी झाली आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; 12 बळी, 452 पॉझिटिव्ह
Next Article माढा तालुक्यात आज कोरोनाबाधितांचा आकडा द्विशतक पार









