शहर काझी अमजद अली सय्यद यांची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद-उल-फित्रची नमाज घरातच अदा करा
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईदसाठी आज बुधवार 12 मे रोजी चंद्र बघावे जर चंद्रदर्शन न झाल्यास गुरुवारी 13 मे रोजी 30 वा रोजा (उपवास ) पूर्ण करून शुक्रवार 14 मे रोजी ईद उल फित्र साजरी होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईदची ईदगाह मैदानावर होणार नसून मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरातच अदा करावी असे आवाहन सोलापूरचे शहर काझी सय्यद अहमदअली निजामी यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यात ही कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानावर होणार नाही. कोरोनाचे नियम पाळत मुस्लिम बांधवांनी नमाज घरातच अदा करावी. ईदच्या दिवशी शुभेच्छा देताना हात व आलिंगन देऊन नये, यंदाची ईद साधेपणाने करा आणि गरजूंना मदत करा असे आवाहन शहर काझी यांनी केले आहे.
देशासह जगभरातील कोरोना दूर व्हावा म्हणून प्रार्थना करा
देशात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी यंदाही रमजान सण साध्या पद्धतीने साजरे करावे. नमाज पडण्यासाठी ईदगाह मैदानावर येऊ नये , घरातच नमाज अदा करावी, गरिबांना मदत करा, कोरोनातून रुग्ण बरे होण्यासाठी व देशासह जगभरातील कोरोना दूर व्हावे म्हणून अल्लाहकडे प्रार्थना करा.
अमजद अली, शहर काझी