सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर शहरात मंगळवारी 41 तर ग्रामीण भागात 924 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 28 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज नवे कोरोनाबाधित 924 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 22 रुग्णांचा मृत्यू तर 3188 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 924 पैकी 533 पुरुष, 391 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 2475 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 18 हजार 913 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 10 हजार 766 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 8906 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 7982 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 924 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2475 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख 56 हजार 672 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
सोलापूर शहरात नव्याने 41 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 100 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने 6 रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापुर शहरात 2012 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 41 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1971 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 41 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 21 पुरुष तर 20 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 27 हजार 964 झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









