सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 312 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मंगळवारी 154 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 87 पुरुष, 67 स्त्रियांचा समावेश आहे. आज 8 तर आतापर्यंत 779 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 28 हजार 255 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2544 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2390 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 154 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 779 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 23 हजार 125 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
—-
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1052
मंगळवेढा- 1311
बार्शी – 5108
माढा- 2888
माळशिरस – 4780
मोहोळ- 1251
उत्तर सोलापूर – 708
करमाळा- 1985
सांगोला – 2114
पंढरपूर 5586
दक्षिण सोलापूर – 1372
एकूण – 28, 255
———/–
होम क्वांरटाईन – 3289
एकूण तपासणी व्यक्ती- 214238
प्राप्त अहवाल- 214203
प्रलंबित अहवाल- 38
एकूण निगेटिव्ह – 185498
कोरोनाबाधितांची संख्या- 28,255
रुग्णालयात दाखल – 4351
आतापर्यंत बरे – 23,125
मृत – 779
Previous Articleमिरज रेल्वे जंक्शनला महात्मा बसवेश्वरांचे नाव द्या
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.