एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 32,402 वरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांची माहिती, 1702 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज मंगळवारी 98 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 69 पुरुष, 29 स्त्रियांचा समावेश आहे. आज 5 तर आतापर्यंत 969 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 32 हजार 402 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 702 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2993 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2895 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 98 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 969जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 29 हजार 731 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1147
मंगळवेढा- 1459
बार्शी – 5873
माढा- 3351
माळशिरस – 5667
मोहोळ- 1625
उत्तर सोलापूर – 741
करमाळा- 2066
सांगोला – 2516
पंढरपूर 6500
दक्षिण सोलापूर – 1457
एकूण – 32,402
होम क्वांरटाईन – 21544
एकूण तपासणी व्यक्ती- 271001
प्राप्त अहवाल- 270954
प्रलंबित अहवाल- 47
एकूण निगेटिव्ह – 238553
कोरोनाबाधितांची संख्या- 32,402
रुग्णालयात दाखल – 1702
आतापर्यंत बरे – 29, 731
मृत – 969









