मराठा समाजाचे बंदची हाक
प्रतिनिधी / सोलापूर
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी व स्थगिती उठविण्यासाठी सोमवार 21 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने सोलापूर शहर जिल्हा बंदची हाक दिली आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, समाजकंटकांकडून एसटीची तोडफोड होऊ नये म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यातील एसटी बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी घेतला असून तसे आदेश काढले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यामुळे राज्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा बांधव आक्रमक झाला आहे. गनिमीकावा, धरणे आंदोलन तसेच आमदार-खासदारसमोर आंदोलन करून मराठा समाजाने निषेध नोंदवला आहे. दरम्यान 21 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंद’ची हाक दिली आहे.
त्यामुळे या बंद काळात एसटी बसेसची तोडफोड होऊ नये म्हणून कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 21 रोजी मध्यरात्री 12:01 पासून ते 21 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यातील एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.
Previous Articleकोरेगाव कोविड सेंटरचे गृह राज्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Next Article दापोली तालुक्यातील झाडे तोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश









