आज 13 , एकूण मृत 452, एकूण बरे 10, 215
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज गुरुवारी एकाच दिवशी 13 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 610 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 378 पुरुष, 232 स्त्रियांचा समावेश आहे. आज 13 तर आतापर्यंत 452 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 15 हजार 526 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 859 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 4037 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 3427 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 610 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 15 हजार 526 रुग्णांपैकी 9 हजार 454 पुरुष, 6 हजार 32 स्त्री आहेत. आतापर्यंत 452 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 10 हजार 215 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 752
मंगळवेढा- 668
बार्शी – 3032
माढा- 1403
माळशिरस – 2023
मोहोळ- 707
उत्तर सोलापूर – 567
करमाळा- 1048
सांगोला – 879
पंढरपूर 3342
दक्षिण सोलापूर – 1105
एकूण – 15,526
होम क्वांरटाईन – 6476
एकूण तपासणी व्यक्ती- 123534
प्राप्त अहवाल- 123408
प्रलंबित अहवाल- 126
एकूण निगेटिव्ह – 107882
कोरोनाबाधितांची संख्या- 15, 526
रुग्णालयात दाखल – 4,859
आतापर्यंत बरे – 10,215
मृत – 452
Previous Articleभार्गवी चिरमुले दिसणार जिजाऊंच्या भूमिकेत
Next Article सोयाबीन मळणीवर वळीव पावसाचे सावट









