प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज रविवारी 342 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 190 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 11 हजार 213 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 3008 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 342 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2666 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 342 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 211 पुरुष आणि 131 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11213 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 86118
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 11213
-प्राप्त तपासणी अहवाल : 85971
-प्रलंबित तपासणी अहवाल : 147
-निगेटिव्ह अहवाल : 74758
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 324
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 3047
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 7842
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









