प्रतिनिधी / सोलापूर
निधी असूनही राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट व आरोग्य सेविकांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहे. याबाबतची तक्रार यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी हे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांच्याकडे घेऊन आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी यातील समन्वयक प्रशांत निकंबे यांना याबाबत जाब विचारत येत्या दोन दिवसात वेतन करा आणि ‘जमत असेल तर काम करा, अन्यथा सोडून द्या’ अशा शब्दात खडसावले.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट व आरोग्य सेविका यांची 52 पथके, (प्रत्येक पथकात एक पुरूष व एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक फार्मासिस्ट व एक आरोग्य सेविका) हे शुन्य ते 18 वयोगटातील बालक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, गंभीर आजारांचे प्राथमिक अवस्थेत निदान करून त्यावर उपचार करणे, कुपोषीत बालकांची काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करणे आदी कामे करत आहेत. तसेच सध्या कोरोना काळातही शासनाच्या आदेशानुसार कोरोना नियंत्रण कक्ष, कोविड केअर सेंटर, फिवर क्लिनीक, कॉन्ट्रॅक्ट ड्रेसिंग, रुग्णालयांची ओपीडी आदी सर्व ठिकाणी सर्व जबाबदार्या पार पाडत आहेत. परंतु निधी असताना कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांचे वेतन गेल्या 2 महिण्यांपासुन रखडले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे समन्वयक प्रशांत निकंबे यांना ‘अशा बेजबाबदार वर्तनुकीमुळे तुम्हाला काढून टाकले होते. गेली 8 महिने तुम्ही घरी होतात. आता तरी निट काम करा. येत्या दोन दिवसात वेतन अदा झाले पाहिजे.’ असे म्हणत ‘जमत असेल तर काम करा, अन्यथा सोडून द्या’ अशा शब्दात समन्वयक निकंबे यांना खडसावले.
जिल्हा शल्य चिकीत्सकांचे दुर्लक्ष
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट व आरोग्य सेविक यांच्या 52 पथकांकडून नियमानुसार काम करून घेणे, त्यांचे वेळेवर वेतन होणे याकडे प्रमुख म्हणून जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदिप ढेले यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्यांचे दुर्लक्ष असल्याने निधी असूनही समन्वयक निकंबे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून वेतन अदा केले नाही. त्यामुळे या प्रकाराकडे खुद्द जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. ढेले यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याबाबत डॉ. ढेले व समन्वयक निकंबे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








