तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 252 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज रविवारी 120 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 74 पुरुष, 46 स्त्रियांचा समावेश आहे. आज 10 तर आतापर्यंत 823 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 28 हजार 923 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 3 हजार 679 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1399 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1279 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 120 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 823 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 24 हजार 421 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1059
मंगळवेढा- 1337
बार्शी – 5203
माढा- 2941
माळशिरस – 4965
मोहोळ- 1302
उत्तर सोलापूर – 715
करमाळा- 1999
सांगोला – 2302
पंढरपूर 5716
दक्षिण सोलापूर – 1384
एकूण – 28, 923
———
होम क्वांरटाईन – 4065
एकूण तपासणी व्यक्ती- 221230
प्राप्त अहवाल- 221194
प्रलंबित अहवाल- 36
एकूण निगेटिव्ह – 192272
कोरोनाबाधितांची संख्या- 28,923
रुग्णालयात दाखल – 3679
आतापर्यंत बरे – 24,421
मृत – 823









