तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी 192 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 122 पुरुष, 70 स्त्रियांचा समावेश आहे. आज 7 तर आतापर्यंत 96 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 3312 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1398 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1104 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 912 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 192 पॉझिटिव्ह आढळल्या आहे .3312 रुग्णांपैकी 2012 पुरुष 1297 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 96 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1818 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
Previous Articleसांगली : माजी महापौर हारुणभाई शिकलगार यांचे निधन
Next Article 2 दहशतवाद्यांसह पाकिस्तानी सैनिकाचा खात्मा









