एकाच दिवशी 139 रुग्ण कोरोनामुक्त, एकाच दिवशी 7 जणांचा मृत्यू
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंगळवारी 148 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 71 पुरुष, 77 स्त्रियांचा समावेश आहे. आज 7 तर आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 3120 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1287 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी मंगळवारी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 944 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 796 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 148 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 3120 रुग्णांपैकी 1893 पुरुष 1227 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1744 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाण
अक्कलकोट – 453, मंगळवेढा- 83, बार्शी – 721, माढा- 145, माळशिरस – 148, मोहोळ- 220, उत्तर सोलापूर – 253, करमाळा- 86, सांगोला- 56, पंढरपूर – 421, दक्षिण सोलापूर – 534, एकूण – 3120
होम क्वांरटाईन – 3832
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 23996
प्राप्त अहवाल- 23907
प्रलंबित अहवाल- 89
एकूण निगेटिव्ह – 20728
कोरोनाबाधितांची संख्या- 3120
रुग्णालयात दाखल – 1287
आतापर्यंत बरे – 1744
मृत – 89