प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज शनिवारी 134 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 85 पुरुष, 49 स्त्रियांचा समावेश आहे. आज 3 तर आतापर्यंत 1033 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 35 हजार 237 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 774 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2287जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2153 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 134 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1033 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 32 हजार 430 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1154
मंगळवेढा- 1596
बार्शी – 6257
माढा- 3710
माळशिरस – 6404
मोहोळ- 1731
उत्तर सोलापूर – 781
करमाळा- 2140
सांगोला – 2728
पंढरपूर 7221
दक्षिण सोलापूर – 1515
एकूण – 35, 237
होम क्वांरटाईन – 11990
एकूण तपासणी व्यक्ती- 323536
प्राप्त अहवाल- 323488
प्रलंबित अहवाल- 48
एकूण निगेटिव्ह – 288652
कोरोनाबाधितांची संख्या- 35,237
रुग्णालयात दाखल – 1774
आतापर्यंत बरे – 32,430
मृत – 1033