प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज गुरुवारी 384 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 135 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 12 हजार 509 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 2595 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 384 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2210 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 384 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 234 पुरुष आणि 150 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12509 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 97723
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 12509
प्राप्त तपासणी अहवाल : 97604
प्रलंबित तपासणी अहवाल : 117
निगेटिव्ह अहवाल : 85094
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 360
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 3348
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 8801
Previous Articleश्रीलंकेतील तेल टॅंकर ‘एमटी न्यू डायमंड’ ला लागली भीषण आग
Next Article वळीवडे येथे दलित महासंघाचे चिखल भरो आंदोलन …









