प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 366 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 237 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 160 पुरुष, 77 स्त्रियांचा समावेश आहे. आज 6 तर आतापर्यंत 747 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 27 हजार 177 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 919 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2370 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2133 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 237 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 747 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 21 हजार 511 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1039
मंगळवेढा- 1258
बार्शी – 4990
माढा- 2792
माळशिरस – 4569
मोहोळ- 1164
उत्तर सोलापूर – 703
करमाळा- 1976
सांगोला – 2075
पंढरपूर 5333
दक्षिण सोलापूर – 1278
एकूण – 27, 177
होम क्वांरटाईन – 3283
एकूण तपासणी व्यक्ती- 203488
प्राप्त अहवाल- 203411
प्रलंबित अहवाल- 78
एकूण निगेटिव्ह – 176234
कोरोनाबाधितांची संख्या- 27,177
रुग्णालयात दाखल – 4919
आतापर्यंत बरे – 21,511
मृत – 747
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









