प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 289 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज बुधवारी 140 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 86 पुरुष, 54 स्त्रियांचा समावेश आहे. आज 8 तर आतापर्यंत 787 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 28 हजार 395 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 4 हजार 194 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2376 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2236 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 140 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 787 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 23 हजार 414 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1052
मंगळवेढा- 1321
बार्शी – 5117
माढा- 2895
माळशिरस – 4813
मोहोळ- 1259
उत्तर सोलापूर – 708
करमाळा- 1986
सांगोला – 2222
पंढरपूर 5646
दक्षिण सोलापूर – 1376
एकूण – 28, 395
होम क्वांरटाईन – 3450
एकूण तपासणी व्यक्ती- 216214
प्राप्त अहवाल- 216128
प्रलंबित अहवाल- 86
एकूण निगेटिव्ह – 187734
कोरोनाबाधितांची संख्या- 28,395
रुग्णालयात दाखल – 4194
आतापर्यंत बरे – 23,414
मृत – 787
Previous Articleमंत्रालये, सार्वजनिक विभागांना BSNL, MTNL ची सेवा अनिवार्य
Next Article मुंबईत उद्यापासून मेट्रो धावणार; ग्रंथालयेही सुरू









