प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी 255 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 180 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 10 हजार 871 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 2897 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 255 जणांचे अहवाल पॉझिटव्ह तर 2642 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 255 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 170 पुरुष आणि 85 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10871 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 82963
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 10871
-प्राप्त तपासणी अहवाल : 82834
-प्रलंबित तपासणी अहवाल : 129
-निगेटिव्ह अहवाल : 71963
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 317
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2902
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 7652
Previous Articleअभावीपतर्फे शैक्षणिक मुद्द्यांबाबत माजी मुख्यमंत्र्यांना निवेदन
Next Article मिरज कोविड सेंटरला देवेंद्र फडणवीसांची धावती भेट









