तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
ग्रामीणमध्ये शनिवारी 255, तर शहरात 39 नवे रुग्ण आढळून आले. 13 जणांचा मृत्यू झाला असून, 298 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. ग्रामीण भागात 255 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातून बरे होऊन 180 रुग्ण घरी परतले तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 871 वर पोहोचल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले.
2 हजार 897 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 255 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 2 हजार 642 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 255 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 170 पुरुष आणि 85 महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांची संख्या 10 हजार 871 झाली आहे. शहारात 118 रुग्ण आढळले, तर उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 118 जणांना घरी सोडण्यात आल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 1 हजार 295 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1 हजार 256 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 39 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 19 पुरुष तर 20 महिलांचा समावेश आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 544 झाली आहे.
ग्रामीणमधील संख्या
एकूण तपासणा : 82 हजार 963
पॉझिटिव्ह रुग्ण : 10 हजार 871
प्राप्त तपासणी अहवाल : 82 हजार 834
प्रलंबित तपासणी अहवाल : 129
निगेटिव्ह अहवाल : 71 हजार 963
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 317
रुग्णालयात दाखल बाधित : 2 हजार 902
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले : 7 हजार 652
शहरातील संख्या
एकूण तपासणी : 60 हजार 294
पॉझिटिव्ह रुग्ण : 6 हजार 544
प्राप्त तपासणी अहवाल : 62 हजार 480
प्रलंबित तपासणी अहवाल : 93
निगेटिव्ह अहवाल : 55 हजार 936
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 412
रुग्णालयात दाखल बाधित : 862
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले : 5 हजार 270









