प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात रविवारी 251 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 163 पुरुष, 88 स्त्रियांचा समावेश आहे. आज 8 तर आतापर्यंत 715 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 26 हजार 300 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 5 हजार 214 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2208 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1957 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 251 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 715 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 20 हजार 371जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1029
मंगळवेढा- 1228
बार्शी – 4876
माढा- 2713
माळशिरस – 4365
मोहोळ- 1116
उत्तर सोलापूर – 693
करमाळा- 1954
सांगोला – 1955
पंढरपूर 5101
दक्षिण सोलापूर – 1270
एकूण – 26, 300
होम क्वांरटाईन – 3751
एकूण तपासणी व्यक्ती- 194803
प्राप्त अहवाल- 194725
प्रलंबित अहवाल- 79
एकूण निगेटिव्ह – 168425
कोरोनाबाधितांची संख्या- 26,300
रुग्णालयात दाखल – 5214
आतापर्यंत बरे – 20,371
मृत – 715
Previous Articleचांदोली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जखमी
Next Article ड्रग रॅकेटच्या तपासातून दिशाभूल होण्याची शक्यता









