प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी 241 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 161 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी आज गुरूवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 3013 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 241 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 2772 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 241 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 152 पुरुष आणि 89 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6772 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 55100
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6772
-प्राप्त तपासणी अहवाल : 54984
-प्रलंबित तपासणी अहवाल : 116
-निगेटिव्ह अहवाल : 48213
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 194
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2728
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 3850
Previous Articleबेंगळूर हिंसाचार प्रकरणी एकूण ७ एफआयआर दाखल
Next Article पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 1,50, 745 वर








