प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज रविवारी 201रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 125 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 78 पुरुष, 46 स्त्रियांचा समावेश आहे. आज 7 तर आतापर्यंत 958 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 32 हजार 209 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 721 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2737 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2612 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 125 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 958 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 29 हजार 530 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1146
मंगळवेढा- 1453
बार्शी – 5852
माढा- 3337
माळशिरस – 5616
मोहोळ- 1617
उत्तर सोलापूर – 740
करमाळा- 2054
सांगोला – 2503
पंढरपूर 6446
दक्षिण सोलापूर – 1445
एकूण – 32,209
होम क्वांरटाईन – 21149
एकूण तपासणी व्यक्ती- 266375
प्राप्त अहवाल- 266327
प्रलंबित अहवाल- 48
एकूण निगेटिव्ह – 234119
कोरोनाबाधितांची संख्या- 32,209
रुग्णालयात दाखल – 1721
आतापर्यंत बरे – 29, 530
मृत – 958