प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 175 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज बुधवारी 140 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 88 पुरुष, 52 स्त्रियांचा समावेश आहे. आज 6 तर आतापर्यंत 901 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 30 हजार 241 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 2 हजार 841 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2246 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2106 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 140 पॉझिटिव्ह आढळले आहे. आतापर्यंत 901 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 26 हजार 499 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1073
मंगळवेढा- 1389
बार्शी – 5426
माढा- 3119
माळशिरस – 5248
मोहोळ- 1425
उत्तर सोलापूर – 722
करमाळा- 2014
सांगोला – 2412
पंढरपूर 6002
दक्षिण सोलापूर – 1411
एकूण – 30, 241
होम क्वांरटाईन – 4198
एकूण तपासणी व्यक्ती- 236298
प्राप्त अहवाल- 236259
प्रलंबित अहवाल- 39
एकूण निगेटिव्ह – 206019
कोरोनाबाधितांची संख्या- 30,241
रुग्णालयात दाखल – 2841
आतापर्यंत बरे – 26, 499
मृत – 901
- आज 140 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
– एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 30,241 वर - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांची माहिती
- 2841 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार









