तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 157 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 92 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 3555 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 157 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 3398 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 157 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 98 पुरुष आणि 59 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 33790 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 291963
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 33790
प्राप्त तपासणी अहवाल : 291910
प्रलंबित तपासणी अहवाल : 53
निगेटिव्ह अहवाल : 258120
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 1004
रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या : 1279
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 31508
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण
अक्कलकोट 1149, बार्शी 6121, करमाळा 2101, माढा 3528, माळशिरस 6016, मंगळवेढा 1518, मोहोळ 1680, उत्तर सोलापूर 749, पंढरपूर 6828, सांगोला 2616, दक्षिण सोलापूर 1485 एकुण 33790









