प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 125 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान आठ रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 248 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 1402 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1277 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 125 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 68 पुरुष आणि 57 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28701 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 218582
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 28701
-प्राप्त तपासणी अहवाल : 218508
-प्रलंबित तपासणी अहवाल : 74
-निगेटिव्ह अहवाल : 189807
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 803
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 3970
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 22929
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण
अक्कलकोट 1057, बार्शी 5178, करमाळा 1994, माढा 2916, माळशिरस 4901, मंगळवेढा 1328, मोहोळ 1285, उत्तर सोलापूर 710, पंढरपूर 5676, सांगोला 2274, दक्षिण सोलापूर 1383 आणि एकुण 28701
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









