प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात शनिवारी एकाच दिवशी 1128 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर आज 246 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 146 पुरुष, 100 स्त्रियांचा समावेश आहे. आज 8 तर आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 26 हजार 49 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 5 हजार 193 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1721 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1475 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 246 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 707 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 20 हजार 149 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1028
मंगळवेढा- 1219
बार्शी – 4833
माढा- 2668
माळशिरस – 4328
मोहोळ- 1099
उत्तर सोलापूर – 691
करमाळा- 1905
सांगोला – 1931
पंढरपूर 5037
दक्षिण सोलापूर – 1267
एकूण – 26, 049
होम क्वांरटाईन – 3743
एकूण तपासणी व्यक्ती- 192517
प्राप्त अहवाल- 192451
प्रलंबित अहवाल- 67
एकूण निगेटिव्ह – 166402
कोरोनाबाधितांची संख्या- 26,049
रुग्णालयात दाखल – 5193
आतापर्यंत बरे – 20,149
मृत – 707
Previous Articleरशियात कोरोनाबाधितांची संख्या 12 लाखांवर
Next Article मृत अन् बधितांमध्ये साताऱ्याची आघाडी









