तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज 107 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 61 पुरुष, 46 स्त्रियांचा समावेश आहे. आज 5 तर आतापर्यंत 927 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 31 हजार 262 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 707 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1538 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1431 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 101 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 927 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 28 हजार 628 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1132
मंगळवेढा- 1415
बार्शी – 5689
माढा- 3231
माळशिरस – 5422
मोहोळ- 1542
उत्तर सोलापूर – 732
करमाळा- 2036
सांगोला – 2448
पंढरपूर 6189
दक्षिण सोलापूर – 1426
एकूण – 31,262
होम क्वांरटाईन – 1119
एकूण तपासणी व्यक्ती- 247705
प्राप्त अहवाल- 247657
प्रलंबित अहवाल- 48
एकूण निगेटिव्ह – 216396
कोरोनाबाधितांची संख्या- 31,262
रुग्णालयात दाखल – 17707
आतापर्यंत बरे – 28, 628
मृत – 927









