एकूण संख्या गेली 17,339 वर
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज रविवारी एकाच दिवशी 13 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 601 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 392 पुरुष, 209 स्त्रियांचा समावेश आहे. आज 13 तर आतापर्यंत 494 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 17 हजार 339 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 5 हजार 906 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3998 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 3397 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 601 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 17 हजार 339 रुग्णांपैकी 10 हजार 619 पुरुष, 6 हजार 720 स्त्री आहेत. आतापर्यंत 494 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 10 हजार 939 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 788
मंगळवेढा- 816
बार्शी – 3382
माढा- 1632
माळशिरस – 2303
मोहोळ- 772
उत्तर सोलापूर – 575
करमाळा- 1197
सांगोला – 1059
पंढरपूर 3684
दक्षिण सोलापूर – 1131
एकूण – 17, 339
होम क्वांरटाईन – 5893
एकूण तपासणी व्यक्ती- 136716
प्राप्त अहवाल- 136579
प्रलंबित अहवाल- 137
एकूण निगेटिव्ह – 119240
कोरोनाबाधितांची संख्या- 17, 339
रुग्णालयात दाखल – 5,906
आतापर्यंत बरे – 10, 939
मृत – 494