प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी 49 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 27 पुरुष, 22 स्त्रियांचा समावेश आहे. आज 2 तर आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 899 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 493 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी सोमवारी दिली. आजचे कोरोनाबाधित रुग्ण करमाळा, , उत्तर सोलापूर ,मोहोळ , माळशिरस, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी तालुक्यातील आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 211 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 162अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 49 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 899 रुग्णांपैकी 576 पुरुष 323स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 368 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 158
मंगळवेढा- 5
बार्शी – 197
माढा- 26
माळशिरस – 12
मोहोळ- 48
उत्तर सोलापूर – 102
करमाळा- 13
सांगोला – 6
पंढरपूर 47
दक्षिण सोलापूर – 285
एकूण – 899
होम क्वांरटाईन – 1962
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 6502
प्राप्त अहवाल- 6434
प्रलंबित अहवाल- 68
एकूण निगेटिव्ह – 5536
कोरोनाबाधितांची संख्या- 899
रुग्णालयात दाखल – 493
आतापर्यंत बरे – 368
मृत – 38
Previous Articleपुणे विभागात 28, 989 रुग्ण कोरोनामुक्त!
Next Article वैरागमध्ये कोरोना विळख्यातच प्रशासनाचा सावळा गोंधळ








