एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २३, ९९६ वर
जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांची माहिती
६,२७६ व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात रविवारी ४३५ कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी ३५८ पुरुष, १७७ स्त्रियांचा समावेश आहे. आज १४ तर आतापर्यंत ६५९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण २३ हजार ९९६ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ६ हजार २७६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज २३१९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील १८८४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ४३५ पॉझिटिव्ह आढळल्या आहे. २३ हजार ९९६ रुग्णांपैकी १४ हजार ७८४ पुरुष, ९ हजार २१२ स्त्री आहेत. आतापर्यंत ६५९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १७ हजार ६१ जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट १०१, मंगळवेढा १११४, बार्शी ४४१६, माढा २४११, माळशिरस ३८७२, मोहोळ ९९८, उत्तर सोलापूर ६७८, करमाळा १६१८, सांगोला १७६२, पंढरपूर ४६७२, दक्षिण सोलापूर १२४२, एकूण २३ हजार ९९६
होम क्वांरटाईन ४,४७१
एकूण तपासणी व्यक्ती १,७८,८२०
प्राप्त अहवाल १७८७३२
प्रलंबित अहवाल ८९
एकूण निगेटिव्ह १,५४,७३६
कोरोनाबाधितांची संख्या २३,९९६
रुग्णालयात दाखल ६२७६
आतापर्यंत बरे १,७६१
मृत ६५९