आज दिलासा, १३८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले
एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २६,६७४ वर
जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांची माहिती
५००६ व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागाला दिलासा मिळाला असून एकाच दिवशी 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मंगळवारी १३८ कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी ८६ पुरुष, ५२ स्त्रियांचा समावेश आहे. आज ५ तर आतापर्यंत ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण २६ हजार ६७४ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ५ हजार ६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज २०६३ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील १९२५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर १३८ पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २० हजार ९३८ जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट- १०३२, मंगळवेढा- १२३०, बार्शी- ४९३२, माढा- २७६४, माळशिरस– ४६६०, मोहोळ- ११२७ ,उत्तर सोलापूर – ६९७, करमाळा-१९६९, सांगोला- २००८, पंढरपूर- ५२०१, दक्षिण सोलापूर– १,२७२
एकूण २६,६७४
होम क्वांरटाईन – ३५५१
एकूण तपासणी व्यक्ती- १,९८,४९६
प्राप्त अहवाल- १,९८,४४६
प्रलंबित अहवाल- ५१
एकूण निगेटिव्ह – १७१७१७२
कोरोनाबाधितांची संख्या- २६६७४
रुग्णालयात दाखल – ५००६
आतापर्यंत बरे – २०९३८
मृत – ७३०