प्रतिनिधी / सोलापूर
ग्रामीण भागात सोमवारी 174, तर शहरात 53 नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यात ग्रामीणमध्ये सात, तर शहरात एक अशा आठ जणांचा मृत्यू झाला असून, जिह्यातील 308 जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
ग्रामीण भागात सोमवारी 174 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 287 रुग्णांना घरी सोडल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले. 1 हजार 282 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 174 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1 हजार 108 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 174 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 91 पुरुष आणि 83 महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 878 झाली आहे.
शहारात सोमवारी नव्याने 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 21 जणांना घरी सोडण्यात आल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 129 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 76 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 53 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 27 पुरुष तर 26 महिलांचा समावेश आहे. बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 951 झाली आहे.
ग्रामीणमधील संख्या
एकूण तपासणी ः 63 हजार 366
पॉझिटिव्ह रुग्ण ः 7 हजार 878
प्राप्त तपासणी अहवाल ः 63 हजार 260
प्रलंबित तपासणी अहवाल ः 106
निगेटिव्ह अहवाल ः 55 हजार 383
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 220
रुग्णालयात दाखल बांधित ः 2 हजार 860
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले ः 4 हजार 798
शहरातील संख्या
एकूण तपासणी ः 48 हजार 455
पॉझिटिव्ह रुग्ण ः 5 हजार 951
प्राप्त तपासणी अहवाल ः 48 हजार 330
प्रलंबित तपासणी अहवाल ः 125
निगेटिव्ह अहवाल ः 42 हजार 379
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 392
रुग्णालयात दाखल बाधित ः 1 हजार 34
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले ः 4 हजार 525









