तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
ग्रामीण भागात शनिवारी 179 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये 117 पुरुष, 62 महिलांचा समावेश आहे. आज दोन, तर आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 हजार 563 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 6 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले.
मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा तालुक्यात आढळले आहेत. 2 हजार 61 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1 हजार 882 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 179 पॉझिटिव्ह आढळले आहेत. 1 हजार 563 रुग्णांपैकी 977 पुरुष, 586 महिला आहेत. आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 हजार 6 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
ग्रामीणमधील संख्या
अक्कलकोट – 292
मंगळवेढा- 47
बार्शी – 362
माढा- 63
माळशिरस – 32
मोहोळ- 101
उत्तर सोलापूर – 140
करमाळा- 21
सांगोला – 10
पंढरपूर 105
दक्षिण सोलापूर – 390
एकूण – 1 हजार 563
होम क्वारंटाईन – 2 हजार 547
आजपर्यंत तपासणी- 1 हजार 809
प्राप्त अहवाल- 10 हजार 715
प्रलंबित अहवाल- 94
एकूण निगेटिव्ह – 9 हजार 153
कोरोनाबाधितांची संख्या- 1 हजार 563
रुग्णालयात दाखल – 1 हजार 6
आतापर्यंत बरे – 514
मृत – 43









