तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 164 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मंगळवारी 117 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 72 पुरुष, 45 स्त्रियांचा समावेश आहे. आज 6 तर आतापर्यंत 895 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 30 हजार 101 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 2 हजार 882 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1316जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1199अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 117 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 895 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 26 हजार 324 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट 1072, मंगळवेढा 1385, बार्शी 5409, माढा 3108, माळशिरस – 5224, मोहोळ1415, उत्तर सोलापूर – 722, करमाळा-2012, सांगोला 2404, पंढरपूर5944, दक्षिण सोलापूर – 1406, एकूण -30, 101
होम क्वांरटाईन – 4187
एकूण तपासणी व्यक्ती- 234013
प्राप्त अहवाल- 233972
प्रलंबित अहवाल- 41
एकूण निगेटिव्ह – 203872
कोरोनाबाधितांची संख्या- 30,101
रुग्णालयात दाखल – 2882
आतापर्यंत बरे – 26, 324
मृत – 895