प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात रविवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 260 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 87 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी रविवारी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 2304 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 260 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2044 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 260 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 159 पुरुष आणि 101 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1822 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 13131
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 1822
-प्राप्त तपासणी अहवाल : 13019
-प्रलंबित तपासणी अहवाल : 112
-निगेटिव्ह अहवाल : 11197
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 44
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1178
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 601
Previous Articleकोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे ५ बळी, कोरोना बळींचे अर्धशतक पूर्ण
Next Article रत्नागिरीत २४ तासात ४६ नवे रुग्ण








