बरे झाल्याने तब्बल 117 रुग्णांना सोडले घरी
एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 5557 वर, 2235 रुग्ण रुग्णालयात घेत आहेत उपचार
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शनिवारी उशिरा मिळालेल्या रिपोर्टनुसार 371 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 117 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात 3221 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 371 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 2850 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 371 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 229 पुरुष आणि 142 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5557 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 42775
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5557
-प्राप्त तपासणी अहवाल : 42619
-प्रलंबित तपासणी अहवाल : 156
-निगेटिव्ह अहवाल : 37063
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 162
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2235
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 3160
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









