बरे झाल्याने तब्बल 84 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र व नगरपालिका क्षेत्र वगळून मंगळवारी उशिरा मिळालेल्या रिपोर्टनुसार 209 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 84 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
ग्रामीण क्षेत्रात 2076 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 209 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1867 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 209 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 129 पुरुष आणि 80 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4045 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 35626
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 4045
-प्राप्त तपासणी अहवाल : 35536
-प्रलंबित तपासणी अहवाल : 90
-निगेटिव्ह अहवाल : 31491
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 121
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1625
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2299
Previous Articleसोलापूर : बार्शीत बाजार समितीतील व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद
Next Article प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये








