प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी 137 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 71 पुरुष, 66 स्त्रियांचा समावेश आहे. आज 6 तर आतापर्यंत 69 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 2666 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1668 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी शनिवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ , दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा, बार्शी, सांगोला तालुक्यातील आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1375 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1238 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 137 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 2666 रुग्णांपैकी 1631पुरुष 1035 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 69 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 929 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 426
मंगळवेढा- 64
बार्शी – 665
माढा- 96
माळशिरस – 108
मोहोळ- 192
उत्तर सोलापूर – 215
करमाळा- 68
सांगोला – 36
पंढरपूर 310
दक्षिण सोलापूर – 486
एकूण – 2666
होम क्वांरटाईन – 3547
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 20464
प्राप्त अहवाल- 20356
प्रलंबित अहवाल- 108
एकूण निगेटिव्ह – 17691
कोरोनाबाधितांची संख्या- 2666
रुग्णालयात दाखल – 1668
आतापर्यंत बरे – 929
मृत – 69
Previous Articleदेवदत्त करतोय सेटवर वर्कआऊट
Next Article शिरगावात एकाच घरातील तब्बल 20 जण पॉझिटिव्ह








