प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी 33 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 22 पुरुष, 11 स्त्रियांचा समावेश आहे. आज 2 तर आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 850 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 474 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी रविवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मंगळवेढा करमाळा, , उत्तर सोलापूर ,मोहोळ ,दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी तालुक्यातील आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 184 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 151अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 33 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 850 रुग्णांपैकी 549 पुरुष 301 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 340 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 156
मंगळवेढा- 5
बार्शी – 178
माढा- 26
माळशिरस – 11
मोहोळ- 45
उत्तर सोलापूर – 91
करमाळा- 12
सांगोला – 5
पंढरपूर 42
दक्षिण सोलापूर – 279
एकूण – 850
होमक्वांरटाईन – 1824
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 6295
प्राप्त अहवाल- 6223
प्रलंबित अहवाल- 72
एकूण निगेटिव्ह – 5374
कोरोनाबाधितांची संख्या- 850
रुग्णालयात दाखल – 474
आतापर्यंत बरे – 340
मृत – 36
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









